|
शास्त्रज्ञ -
शास्त्रज्ञ
|
| (जन्म : २२-१२-१८८७, मृत्यू : २६-०४-१९२०) |
|
भारतीय गणिती. कुंभकोणम् येथे शालेय शिक्षण. तेथेच सरकारी महाविद्यालयात इंटर सायन्स उत्तीर्ण. त्यानंतर १९१४ पासून केम्ब्रिज विद्यापिठात दाखल. १९१८ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीचा सभासद म्हणून निवड. केम्ब्रिज विद्यापीठाचा फेलो. रामानुजन् हा गणिती शास्त्रातला एक चमत्कार मानला जातो. अंक-शास्त्रात त्याने बसवलेले नियम नि आडाखे त्या शास्त्रातील अतिरती-महारथींनाही थक्क करून सोडणारे होते. सुमारे ८०० पृष्ठे भरतील एवढ्या त्याच्या लिखाणात त्याने चार हजाराहून अधिक प्रमेयांचा उहापोह केला आहे. इंग्लंडची हवा न मानवल्याने वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी हा महान गणिती मृत्यू पावला.
|
|