|
विज्ञान शिक्षण आणि विज्ञानप्रसारासाठी सहकार्य करा. |
|
|
|
|
Written by svr
|
|
Thursday, 08 March 2012 06:11 |
इंटरनेट ही आधुनिक काळातील विज्ञानाची सर्वात मोठी भेट आहे कारण इंटरनेटने जीवनाच्या सर्व क्षेत्रात क्रांती केली आहे. मराठीतून विज्ञान शिक्षण आणि विज्ञानप्रसार यासाठी मात्र इंटरनेटचा वापर झालेला दिसत नाही. सर्व मराठी विद्यार्थ्यांची ही गरज लक्षात घेवून ज्ञानदीप फौंडेशनतर्फे ह्या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे.
या वेबसाईटवर शास्त्रज्ञांची फोटोसहीत माहिती, विज्ञानविषयक पुस्तकांची सूची, शोध, विज्ञानलेख,तारकासमूहांची छायाचित्रे, विज्ञानजिज्ञासा, विज्ञान प्रसारक व्यक्ती आणि संस्थांची माहिती देण्यात आली आहे.
लवकरच यात विज्ञानप्रयोग आणि चलत्चित्रांचा समावेश करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य लोकांपर्यंत व ग्रामीण भागातही विज्ञानप्रसार करण्यासाठी एक खुले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
सर्व विज्ञान शिक्षकांनी व विज्ञानप्रसारकांनी या व्यासपीठाचा विज्ञान शिक्षण आणि विज्ञानप्रसारासाठी वापर करावा अशी अपेक्षा आहे. इ. स.२००४ साली या वेबसाईटचे उद्घाटन मिरजेतील प्रसिद्ध विज्ञान शिक्षक श्री. गो. पां. कंटक यांचे हस्ते करण्यात आले होते त्यावेळच्या वेबसाईटचे चित्र
 |
|
Last Updated on Sunday, 25 March 2012 18:44 |